Diesel Saving Tips: ट्रॅक्टरची योग्य काळजीने २५ टक्क्यापर्यंत इंधन बचत!

Swarali Pawar

इंधन खर्च वाढतोय?

डिझेलचे दर वाढत असल्याने ट्रॅक्टर चालवणे महाग होत आहे. पण काही सोप्या सवयींनी तुम्ही मोठी इंधन बचत करू शकता.

Tractor maintenance tips | Agrowon

योग्य अवजारांची निवड

ट्रॅक्टरच्या क्षमतेनुसार अवजारे वापरणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य अवजारांमुळे काम जास्त आणि इंधन कमी खर्च होते.

Tractor maintenance tips | Agrowon

नियमित देखभाल

डिझेल टाकी स्वच्छ ठेवा आणि फिल्टर वेळेवर बदला. गळती तपासल्यास अनावश्यक इंधन वाया जाणे टाळता येते.

Tractor maintenance tips | Agrowon

इंजिन ऑईलची काळजी

योग्य ग्रेडचे ऑईल वापरून वेळेवर बदलणे आवश्यक आहे. यामुळे इंजिन सुरळीत चालते आणि इंधन कमी लागते.

Tractor maintenance tips | Agrowon

विद्युत प्रणाली विसरू नका

बॅटरीतील पातळी वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. योग्य देखभालीमुळे ट्रॅक्टरची कार्यक्षमता वाढते.

Tractor maintenance tips | Agrowon

वापराच्या सवयी बदला

काम नसताना इंजिन चालू ठेवू नका. क्लचवर सतत पाय ठेवणे टाळा, यामुळे इंधन वाचते.

Tractor maintenance tips | Agrowon

टायर आणि वेग सांभाळा

टायरचा हवेचा दाब योग्य ठेवा आणि वेग नियंत्रित ठेवा. योग्य गिअरमध्ये ट्रॅक्टर चालवल्यास धूर आणि खर्च कमी होतो.

Tractor maintenance tips | Agrowon

छोट्या गोष्टी, मोठी बचत

गळती तात्काळ दुरुस्त करा आणि ब्रेक योग्य वापरा. या सवयींमुळे १० ते २५% इंधन बचत सहज शक्य आहे.

Tractor maintenance tips | Agrowon

Summer Vinecrop Care: उन्हाळ्यात वेलवर्गीय पिकांची काळजी कशी घ्याल? सोपे आणि प्रभावी उपाय

अधिक माहितीसाठी...