Swarali Pawar
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे वेलवर्गीय पिकांवर ताण येतो. वेळीच उपाय केल्यास उत्पादन आणि गुणवत्ता टिकवता येते.
जास्त तापमानामुळे नर फुलं वाढतात आणि मादी फुलं कमी होतात. यामुळे फळधारणा कमी होते आणि उत्पादन घटते.
३५°C पेक्षा जास्त तापमानात फुलगळ वाढते. काकडी कडू होते आणि खरबूजामध्ये रोग वाढतात.
मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव वाढतो. फळमाशी आणि नागअळीमुळे पिकांचे नुकसान वाढते.
सकाळी किंवा सायंकाळीच पाणी द्या आणि ताण येऊ देऊ नका. ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर अधिक फायदेशीर ठरतो.
मल्चिंग केल्याने जमिनीत ओलावा टिकतो. पाणी साचू देऊ नका, निचऱ्याची योग्य व्यवस्था ठेवा.
भुरी आणि इतर रोगांसाठी योग्य फवारणी करा. फळमाशी नियंत्रणासाठी सापळे लावणे उपयुक्त ठरते.
वेळीच उपाय केल्यास उन्हाचा परिणाम कमी करता येतो. योग्य काळजी घेतल्यास चांगले आणि दर्जेदार उत्पादन मिळते.