Swarali Pawar
तोडणीनंतर ऊस जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटावा. जमिनीवर कांड्या राहिल्या तर उगवण कमी होते.
फुटवे जमिनीतून उगवतात आणि जास्त मुळे तयार होतात. बाविस्टीन + इमिडाक्लोप्रिड फवारणीने कीड नियंत्रण होते.
पाचट जाळू नका, सऱ्यांमध्ये आच्छादन करा. मातीची सुपीकता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
युरिया + SSP + पाचट कुजविणारे जिवाणू वापरल्यास पाचट लवकर कुजते. वरंबे मोकळे ठेवल्यास फुटवे जास्त येतात.
तोडणीनंतर ८–१० दिवसांत बगला फोडा. जुनी मुळे तुटून नवीन मुळे जोरात वाढतात.
जमीन ६–७ दिवस उन्हात ठेवून वरखते द्या आणि पाणी द्या. फुटवे जोमाने वाढतात.
तोडणीनंतर १५–२१ दिवसांत नांग्या भरा. एका एकरात ४०,००० ऊस मिळण्यासाठी विरळ जागा भराव्या.
वरची पाने फक्त कात्रीने कापा, शेंडा कापू नका. एक आड एक दिवस हलके पाणी द्या जेणेकरुन रोप लवकर जिवंत होते.