AI in Sugarcane: एआयच्या मदतीने आधुनिक ऊस लागवड कशी करावी?

Swarali Pawar

जमिनीचे स्मार्ट परीक्षण

एआय–आधारित NPK सेन्सर मातीतील pH, नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासतात. त्यावरून कोणते खत आणि किती द्यावे याची अचूक माहिती मिळते.

AI Precision Farming | Agrowon

लागवडीसाठी योग्य वेळ निवड

एआय हवामान अंदाज प्रणाली तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग यावर विश्लेषण करते. शेतकऱ्यांना लागवडीचा सर्वोत्तम दिवस आणि सऱ्या पाडण्याचा योग्य कालावधी सांगितला जातो.

AI Precision Farming | Agrowon

रोगमुक्त बेणे निवड

एआय इमेज डिटेक्शन तंत्रज्ञान बेण्यात कीड किंवा रोग असल्यास ओळखते. यामुळे ऊस बेणे शास्त्रशुद्ध आणि निरोगी मिळते, ज्यामुळे उगवण सुधारते.

AI Precision Farming | Agrowon

स्मार्ट सिंचन

एआय–आधारित स्मार्ट सिंचन प्रणाली मातीतील ओल आणि हवामानानुसार ठिबक सिंचन नियंत्रित करते. पाणी तेवढेच दिले जाते, जे आवश्यक असते आणि पाण्याची बचत होते.

AI Precision Farming | Agrowon

तण आणि पोषण निरीक्षण

ड्रोनद्वारे शेताचे स्कॅनिंग करून एआय तण, दुष्काळ, पोषण कमतरता किंवा वाढीचा वेग कमी झालेला भाग ओळखते. यामुळे वेळेत हस्तक्षेप होऊन नुकसान टळते

AI Precision Farming | Agrowon

कीड व रोग नियंत्रण

एआय कीड व रोगांची प्रतिमा ओळखून लगेच उपचार सुचवते. ड्रोनद्वारे द्रवखत किंवा किटकनाशकाची अचूक फवारणी करता येते.

AI Precision Farming | Agrowon

खत व्यवस्थापन

एआय पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यानुसार खत देण्याचा अलर्ट पाठवते. खतांचा अपव्यय थांबतो आणि ऊस वाढ अधिक मजबूत होते.

AI Precision Farming | Agrowon

उत्पादन आणि अंदाज

एआय हवामान, पाणी, माती व वाढ यावर आधारित ऊस उत्पादन आणि साखर उताऱ्याचा अंदाज देते. यामुळे तोडणीची वेळ आणि विक्रीचे नियोजन अचूक करता येते.

AI Precision Farming | Agrowon

Seed Storage: साठवणूक चुकली तर धान्य- बियाणे खराब! शेतकरी बांधवांनी टाळावेत हे मोठे धोके

Agrowon
अधिक माहितीसाठी...