Mahesh Gaikwad
फणस हे फळ बाहेरून दिसायला जरी काटेरी असले तरी त्यातील गरे गोड असतात. पिकलेले आणि न पिकलेल्या फणसापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात.
फणसाचे फळ तसेच त्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात खनिजे, जीवनसत्त्वे कॅल्शिअम, थायमिन, रिबोफ्लेविन आणि कॅरोटीन असतात. त्यामुळे हे आरोग्यासाठीही फायदेशीर असते.
फणस आणि त्याच्या बियांवर प्रक्रिया करून अनेक मुल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.
फणसापासून जेली, जॅम, पोळी, स्क्वॅश, ज्यूस यासारखे मुल्यवर्धित पदार्थ केले जातात.
ताज्या पिकलेल्या फणसाच्या गऱ्यांपासून जेली तयार केली जाते.
तसेच गऱ्यातील बिया काढून स्वादिष्ट जॅमही तयार केला जातो. हा जॅम चविला अत्यंत चविष्ट असतो.
याशिवाय ताज्या पिकलेल्या फणसाच्या गऱ्यांच्या रसापासून ज्यूस तयार केला जातो.