Mahesh Gaikwad
हिंदीत एक म्हण आहे 'एक अनार सौ बिमार'. पण डाळिंब हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहित आहे का?
डाळिंबामध्ये जीवनसत्वे, लोह, तंतुमय पदार्थ, ओमेगा-६ फॅटी अॅसिडसह अनेक पोषक तत्त्व असतात.
चला तर मग जाणून घेवूयात डाळिंब खाल्लाने आरोग्याला होणारे फायदे.
शरिरातील रक्ताची कमतरता असल्यास डाळिंब खावे. डाळिंबाच्या सेवनामुळे शरिरातील रक्ताची कमी दूर होण्यास मदत होते.
डाळिंबामध्ये एँटी एजिंग तत्त्व असतात. जे त्वचेच्या आरोग्यासाठी खूपच गुणकारी असतात.
उच्च रक्तदाबाचा त्रास नियंत्रित ठेवण्यासाठी डाळिंबाचे सेवन चांगला उपाय आहे. डाळिंबाच्या सेवनामुळे पचनक्रियेची समस्या सुध्दा दूर होते.
तसेच शरिराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासह ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी डाळिंब उपयुक्त असते.