Sugarcane Aphid: पावसाळ्यात उसावर लोकरी माव्याचा धोका! ही काळजी घ्या

Swarali Pawar

लोकरी मावा का वाढतो?

ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि वाढलेली आर्द्रता लोकरी माव्यासाठी पोषक ठरते. त्यामुळे उसाची नियमित पाहणी करणे गरजेचे आहे.

Wooly Aphids on Sugarcane | Agrowon

ओळखायचा कसा?

ही कीड पानांच्या खालच्या बाजूला राहून अन्नरस शोषते. त्यामुळे पाने फिकट, निस्तेज दिसतात आणि कडांपासून सुकू लागतात.

Wooly Aphids on Sugarcane | Agrowon

काळी पडलेली पाने

लोकरी मावा चिकट मधासारखा पदार्थ सोडतो. त्यावर काळी बुरशी वाढून प्रकाशसंश्लेषण कमी होते.

Wooly Aphids on Sugarcane | Agrowon

नियमित पाहणी करा

उसाच्या शेताची दर आठवड्याला तपासणी करा. सुरुवातीच्या अवस्थेत कीड आढळल्यास नियंत्रण करणे सोपे जाते.

Wooly Aphids on Sugarcane | Agrowon

लागवडीत ठेवा योग्य अंतर

पट्टा किंवा रुंद सरी पद्धतीने 4 ते 6 फूट अंतरावर लागवड करा. यामुळे हवा आणि सूर्यप्रकाश चांगला मिळतो.q

Wooly Aphids on Sugarcane | Agrowon

उपयुक्त कीटक

शेताच्या कडेला मका आणि चवळीच्या ओळी लावा. त्यामुळे माव्याचे नैसर्गिक शत्रू वाढण्यास मदत होते.

Wooly Aphids on Sugarcane | Agrowon

बाधित पाने

मावाग्रस्त पाने गोळा करून नष्ट करा. मात्र शेंड्याकडील किमान सात पाने कायम ठेवावीत.

Wooly Aphids on Sugarcane | Agrowon

खत व पाणी संतुलित द्या

जास्त सिंचन आणि नत्रयुक्त खतांचा अतिरेक टाळा. संतुलित व्यवस्थापनामुळे लोकरी माव्याचा प्रादुर्भाव कमी होतो.

Wooly Aphids on Sugarcane | Agrowon

Pulse Production: मूग-उडीद पेरणीपूर्वी वाचा; तज्ज्ञांनी सांगितले महत्त्वाचे सूत्र

Agrowon
अधिक माहितीसाठी...