Swarali Pawar
कमी कालावधीत तयार होणारी आणि कमी पाण्यात तग धरणारी ही पिके आहेत. योग्य नियोजन केल्यास कमी पावसातही चांगले उत्पादन मिळू शकते.
75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतर आणि वाफसा आल्यावरच पेरणी करा. शक्यतो जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी पूर्ण करावी.
मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असणे फायदेशीर ठरते.
पेरणीपूर्वी बुरशीनाशक आणि जैविक संवर्धकांची बीजप्रक्रिया करा. यामुळे उगवण चांगली होते आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
दोन ओळींमध्ये 30 सेंमी आणि दोन रोपांमध्ये 10 सेंमी अंतर ठेवा. यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन उत्पादन वाढते.
शेणखत किंवा कंपोस्टसोबत शिफारशीनुसार रासायनिक खते द्यावीत. संतुलित खत व्यवस्थापनामुळे पीक जोमदार वाढते.
पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली आणि 30 ते 35 दिवसांनी दुसरी कोळपणी करा. सुरुवातीचे तण नियंत्रण उत्पादनासाठी महत्त्वाचे असते.
फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या काळात ओलावा कमी पडू देऊ नका. शक्य असल्यास संरक्षित सिंचन आणि 2 टक्के युरियाची फवारणी करा.