Anuradha Vipat
मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी त्यांना योग्य आणि पौष्टिक आहार देणे अत्यंत आवश्यक आहे.
बदलत्या हवामानात मुले वारंवार आजारी पडू नयेत म्हणून त्यांच्या रोजच्या आहारात खालील सुपरफूड्सचा समावेश नक्की करा
बदाम, अक्रोड आणि पिस्ता यामध्ये व्हिटॅमिन ई, निरोगी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील रोगप्रतिकारक पेशी वाढवण्यास मदत करतात.
रात्री झोपताना मुलांना चिमूटभर हळद टाकून कोमट दूध दिल्यास खोकला, सर्दी आणि संसर्गापासून त्यांचे रक्षण होते.
अंड्याला 'कम्प्लीट फूड' मानले जाते. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे.
संत्री, मोसंबी, आवळा आणि लिंबू यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी शरीरात पांढऱ्या रक्तपेशी तयार करण्यास मदत करते
मुलांचे पचन सुधारण्यासोबतच, पोटातील आरोग्य चांगले ठेवून हे बॅक्टेरिया थेट रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात.