Anuradha Vipat
पावसाळ्यात हवेतील आर्द्रता आणि दूषित पाणी यामुळे टायफॉइड, कॉलरा, गॅस्ट्रो, डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका सर्वाधिक असतो.
या पावसाळी आजारांपासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी खालील सोपे आरोग्य उपाय नक्की फॉलो करा.
पावसाळ्यात जलवाहिन्या दूषित होण्याचा धोका असतो. त्यामुळे पाणी किमान १० ते १५ मिनिटे उकळून, थंड करूनच प्या.
नेहमी गरम आणि ताजे शिजवलेले अन्न खा. शिळे अन्न खाणे पूर्णपणे टाळा.
रस्त्यावरील उघडे अन्न, चाट, आणि पाणीपुरी खाणे टाळा. यामुळे गॅस्ट्रो किंवा फूड पॉयझनिंग होऊ शकते.
रात्री झोपताना मच्छरदाणी वापरा आणि घराबाहेर पडताना अंगभर कपडे घाला.
आहारात आले, तुळशी, मिरी, आणि हळदीचा काढा किंवा चहा समाविष्ट करा.