Anuradha Vipat
मराठी जेवणात कढी-खिचडी किंवा कढी-भात हा अनेकांचा आवडता बेत असतो.
अनेकदा कढी उकळताना किंवा ताक गरम करताना ती फुटते म्हणजेच पाणी वेगळे आणि ताक वेगळे होते. यामुळे कढीची चव आणि पोत दोन्ही बिघडते.
कढी बनवण्यासाठी दही किंवा ताक फ्रिजमधून किमान अर्धा ते एक तास आधी बाहेर काढून ठेवा. थंड ताक गरम तेलात किंवा फोडणीत टाकल्यास ते लगेच फुटते.
ताकात बेसन घालताना त्यात गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या. बेसन हे कढीला बाईंडिंग देण्याचे काम करते.
ताकाचे मिश्रण फोडणीत टाकल्यापासून ते पहिली उकळी येईपर्यंत कढी एकाच दिशेने सतत चमच्याने ढवळत राहा.
कढी बनवताना सुरुवातीला कधीही मीठ टाकू नका. मिठातील सोडियममुळे ताक फुटण्याची शक्यता जास्त असते.
कढी नेहमी मध्यम किंवा कमी आचेवर शिजवावी. मोठ्या आचेवर कढी अचानक तापल्यामुळे ताकाचे पाणी वेगळे होते.