Anuradha Vipat
रोज जेवणानंतर १ लवंग चघळणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
लवंगामध्ये असणारे 'युजेनॉल' नावाचे औषधी घटक आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.
जेवल्यानंतर लवंग चघळल्याने लाळ जास्त प्रमाणात तयार होते, ज्यामुळे पाचक एन्झाईम्स उत्तेजित होतात.
जेवणानंतर अचानक वाढणारी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी लवंग मदत करते.
लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जेवणानंतर ती चघळल्याने तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात.
लवंगामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते.
जेवण झाल्यावर १ लवंग तोंडात ठेवून काही वेळ चघळावी आणि नंतर ती गिळली तरी चालते.