Swarali Pawar
एकाच जमिनीत दोन किंवा अधिक पिके एकत्र घेणे म्हणजे आंतरपीक. यामुळे जमिनीतील पोषणतत्त्वांचा समतोल राखला जातो आणि ओलाव्याचा योग्य वापर होतो.
दोन पिकांचे उत्पन्न एकत्र मिळते, कीड-रोग नियंत्रण सुलभ होते. जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि शेतकऱ्यांचा नफा वाढतो.
६:२ या प्रमाणात गहू आणि हरभऱ्याचे आंतरपीक घ्यावे. म्हणजे गव्हाच्या ६ ओळी आणि हरभऱ्याच्या २ ओळी. हरभरा जमिनीत नत्र वाढवतो आणि गव्हाचे उत्पादन सुधारते.
कांद्याच्या ओळींत कोथिंबीर किंवा मेथी पेरल्यास जमिनीचा संपूर्ण वापर होतो. ही पिके लवकर तयार होतात व मुख्य पिकावर परिणाम होत नाही.
८:२ म्हणजे गव्हाच्या ८ ओळी आणि करडई किंवा जवसच्या २ ओळी या प्रमाणात ही पद्धत मध्यम जमिनीत यशस्वी ठरते. करडईओलावा कमी वापरते व गव्हाला कीडरोगांपासून संरक्षण देते
ही दोन्ही कडधान्ये जमिनीत नत्राची पातळी वाढवतात. ओलावा टिकवतात आणि एकत्र उत्पादन देतात.
टोमॅटो + कोबी / फ्लॉवर किंवा गाजर + बीट / कांदा ही संयुगे लाभदायक आहेत. पाणी व खतांचा योग्य वापर होऊन नफा वाढतो.
रब्बी हंगामात योग्य आंतरपीक निवडल्यास उत्पादन, नफा आणि जमिनीची गुणवत्ता सुधारते. ही पद्धत टिकाऊ आणि लाभदायक शेतीसाठी उपयुक्त ठरते.