Anuradha Vipat
गरोदरपण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा काळ असतो.
गरोदरपणाच्या काळात शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे तिला पतीच्या खंबीर साथीची सर्वात जास्त गरज असते.
जड वस्तू उचलणे, वाकून झाडू मारणे या गोष्टी तिला करू देऊ नका. स्वयंपाक किंवा इतर कामांत हातभार लावा.
हॉर्माेन्समधील बदलांमुळे तिची चिडचिड किंवा मूड स्विग्ज होऊ शकतात. अशा वेळी शांत राहा.
गरोदरपणात शरीराचा आकार बदलल्यामुळे अनेक महिलांना नैराश्य येते. ती किती सुंदर दिसतेय हे तिला वारंवार सांगा.
डॉक्टरांच्या प्रत्येक भेटीला तिच्यासोबत नक्की जा. यामुळे तिला सुरक्षित वाटेल.
फॉलिक ॲसिड, कॅल्शियम आणि लोहाच्या गोळ्या ती वेळेवर घेत आहे की नाही याकडे स्वतः लक्ष द्या.