Anuradha Vipat
गरोदरपणात सकाळी येणारा थकवा आणि मळमळ हा प्रामुख्याने शरीरातील संप्रेरकांच्या बदलांमुळे होतो.
बेडवरून उठण्यापूर्वी थोडे सुके बिस्किट्स , टोस्ट किंवा राजगिरा लाडू खा आणि त्यानंतरच १०-१५ मिनिटांनी अंथरुणाबाहेर या.
सकाळी अचानक झटक्यात उठू नका. यामुळे रक्तदाब कमी होऊन चक्कर आल्यासारखे किंवा जास्त थकल्यासारखे वाटू शकते.
रात्री झोपण्यापूर्वी थोडे दूध, बदाम किंवा प्रोटीनयुक्त हलका स्नॅक घ्या.
दिवसातून ५ ते ६ वेळा लहान-लहान जेवण घ्या. आहारात अंडी, डाळी, पनीर यांसारख्या प्रोटीन आणि लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा.
सकाळी मळमळ आणि सुस्ती घालवण्यासाठी आल्याचा चहा किंवा कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणे अत्यंत फायदेशीर ठरते.
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास थकवा दुप्पट वाढतो. दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी किंवा लिंबू पाणी, शहाळ्याचे पाणी, ताक घ्या.