Anuradha Vipat
पावसाळ्याच्या दिवसांत गरोदर महिलांची रोगप्रतिकारक शक्ती सामान्य महिलांपेक्षा कमी असते.
गरोदरपणात स्वतःचे आणि गर्भातील बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी खालील महत्त्वाच्या टिप्स नक्की फॉलो करा.
पावसाळ्यात केवळ उकळलेले आणि कोमट केलेले पाणीच प्या. दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे
घरचे ताजे आणि पूर्ण शिजवलेले अन्नच खा . शिजवलेले अन्न खाल्ल्याने अन्नातून होणारी विषबाधा टळते.
आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध फळे आणि अँटीऑक्सिडंट्स असलेल्या खजूर किंवा सुकामेव्याचा समावेश करा .
मूग डाळीची खिचडी, नाचणीची भाकरी, डाळी आणि गरम सूप्स आहारात घ्या.
पालेभाज्यांऐवजी दुधी भोपळा, पडवळ, कारली, तोंडली आणि भेंडी अशा चांगल्या धुवून शिजवलेल्या फळभाज्या खा.