Anuradha Vipat
लग्नानंतर बाळ कधी होऊ द्यावे हा पूर्णपणे पती-पत्नीचा वैयक्तिक निर्णय असतो.
लग्नानंतर किमान १ ते २ वर्षे एकमेकांना समजून घेण्यासाठी उत्तम मानले जाते. ज्यामुळे भविष्यात बाळाची जबाबदारी मिळून घेणे सोपे जाते.
वैद्यकीयदृष्ट्या स्त्रीचे वय २५ ते ३० वर्षे असताना गर्भधारणेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
पुरुषांचे वय देखील शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करते, त्यामुळे साधारण ३५-४० च्या आत नियोजन करणे गरजेचे आहे.
पती आणि पत्नी दोघांनाही वाटते की ते आता आपण बाळासाठी वेळ देऊ शकतो तेव्हाच हा निर्णय घेणे योग्य ठरते.
जर तुम्हाला करिअरमध्ये ठराविक ध्येय गाठायचे असेल तर ते साध्य केल्यानंतर बाळाचा विचार केल्यास कामाचा आणि घराचा समतोल राखणे सोपे जाते.
जर तुम्हाला लग्नानंतर ३-४ वर्षांनी बाळ हवे असेल, तर एकदा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले असते.