Anuradha Vipat
प्री-डायबिटीज ही मधुमेहापूर्वीची अशी अवस्था आहे, ज्यात रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते, परंतु ती टाईप-२ मधुमेह निदान होण्याइतकी वाढलेली नसते.
योग्य वेळी लक्षणे ओळखून जीवनशैलीत बदल केल्यास मधुमेहाचा धोका पूर्णपणे टाळता येऊ शकतो.
शरीरातील पेशींना रक्तातील साखरेचा योग्य वापर करून ऊर्जा तयार करता येत नसल्यामुळे पुरेशी झोप घेऊनही सतत थकवा जाणवतो.
रक्तातील अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडांना जास्त काम करावे लागते, ज्यामुळे वारंवार लघवी लागते आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊन तहान वाढते.
पेशींना पुरेशी ऊर्जा न मिळाल्यामुळे मेंदूकडून अन्नाची मागणी होते आणि जेवणानंतरही काही वेळातच पुन्हा भूक लागते.
मान, काख, कोपर किंवा गुडघ्यांभोवतीची त्वचा नेहमीपेक्षा जास्त काळी आणि जाडसर होणे हे रक्तातील इन्सुलिन वाढल्याचे महत्त्वाचे लक्षण आहे.
रक्तातील साखरेच्या चढ-उतारामुळे डोळ्यांच्या भिंगावर परिणाम होतो, ज्यामुळे काही वेळा समोरचे चित्र अंधुक किंवा धूसर दिसू शकते.