Anuradha Vipat
दूषित पाण्यामुळे टायफॉइड, कॉलरा, कावीळ , गॅस्ट्रो आणि लेप्टोस्पायरोसिस या मुख्य आजारांचा धोका सर्वाधिक वाढतो.
पावसाचे पाणी साचल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये जंतू आणि विषाणू मिसळतात, ज्यामुळे हे संसर्गजन्य आजार पसरतात.
हा 'साल्मोनेला टायफी' नावाच्या जिवाणूंमुळे होणारा गंभीर आजार असून दूषित पाणी व अन्नातून पसरतो.
दूषित पाण्यातील 'व्हिब्रिओ कॉलरी' जिवाणूंमुळे हा आजार होतो आणि त्यामुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते.
हे विषाणूजन्य आजार थेट यकृतावर परिणाम करतात आणि अस्वच्छ पाण्यामुळे पसरतात.
दूषित पाण्यातील विषाणू किंवा जिवाणूंमुळे पोटाचा संसर्ग होऊन पचनसंस्था बिघडते.
उंदीर किंवा जनावरांच्या मूत्राने दूषित झालेल्या पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यास हा संसर्ग होतो. पायांवरील जखमांमधून हे जिवाणू शरीरात शिरतात.