Anuradha Vipat
ओठांची योग्य काळजी घेतल्यास ओठांवरील लिपस्टिक काढताना कोणतीही समस्या येणार नाही.
ओठांवरील मृत त्वचा काढण्यासाठी हलक्या हाताने ओठांना एक्सफोलिएट करा. यामुळे ओठ मुलायम आणि गुलाबी दिसतील.
शक्यतो ओठांवर जास्त वेळ लिपस्टिक लावू नका. यामुळे ओठ कोरडे होऊ शकतात.
पुरेसे पाणी पिणे ओठांसाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे ओठ आतून हायड्रेटेड राहतात.
ओठांवरील लिपस्टिक काढण्यासाठी क्लिन्जिंग मिल्क किंवा ऑलिव्ह ऑइलचा वापर करणे फायदेशीर ठरते.
ओठांवर हळूवारपणे कापसाच्या बोळ्याने किंवा टिश्यू पेपरने लिपस्टिक काढा.
लिपस्टिक काढल्यानंतर ओठांना मॉइश्चरायझ करणे आवश्यक आहे. यासाठी, तुम्ही लिप बाम, पेट्रोलियम जेली किंवा खोबरेल तेलाचा वापर करू शकता