Anuradha Vipat
हो व्यायाम करण्यापूर्वी काहीतरी खाणे खूप फायदेशीर असते.
रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने चक्कर येणे किंवा लवकर थकवा जाणवू शकतो.
व्यायाम करण्यापूर्वी केळे खा. यात कार्बोहायड्रेट्स आणि पोटॅशियम भरपूर असते, जे व्यायामासाठी झटपट ऊर्जा देतात
यात फायबर जास्त असल्याने ऊर्जा हळूहळू आणि दीर्घकाळ टिकते
मूठभर सुकामेवा खाल्ल्याने शरीराला चांगली प्रथिने आणि फॅट्स मिळतात
खूप जास्त जेवण करून व्यायाम करू नका, अन्यथा पोटाला त्रास होऊ शकतो.
जड अन्न खाल्ले असेल तर किमान २-३ तासांनी आणि हलका नाश्ता केला असेल तर ४५ मिनिटांनी व्यायाम सुरू करा.