Swarali Pawar
पाऊस कधीही सुरू होऊ शकतो, त्यामुळे खरीप हंगामाची तयारी आत्ताच सुरू करा. वेळेवर नियोजन केल्यास कमी पावसातही चांगले उत्पादन मिळू शकते.
पहिला पाऊस पडला म्हणून लगेच पेरणी करू नका. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होण्यासाठी ८० ते १०० मिमी पाऊस होणे आवश्यक आहे.
पहिल्या पावसानंतर पाऊस खंडित झाला तर उगवण धोक्यात येते. त्यामुळे पुरेशा पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणी करावी.
नांगरणी, कुळवणी आणि जमीन सपाटीकरणाची कामे आधीच पूर्ण करा. यामुळे पाऊस पडताच पेरणीसाठी शेत तयार राहते.
शेतातील बांध मजबूत ठेवा आणि पाणी अडवण्याची व्यवस्था करा. यामुळे पावसाचे पाणी शेतातच मुरून ओलावा टिकून राहतो.
मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरी-वरंबा पद्धतीचा वापर करा. त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन पिकांना फायदा होतो.
पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यात साठवा. हेच पाणी नंतर संरक्षित सिंचनासाठी उपयोगी पडू शकते.
माती परीक्षण करून खतांचे योग्य नियोजन करा. तसेच प्रमाणित आणि दर्जेदार बियाणे आधीच खरेदी करून ठेवा.