Aslam Abdul Shanedivan
फळे आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. फळांतून शरीराला महत्वाचे अनेक अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स मिळतात
पण फळांच्या बकेटमधील सर्वसामान्यांना परवडणारे फळ म्हणजे केळी. जे स्वस्त आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
केळीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, व्हिटॅमिन बी ६, पोटॅशियम, सोडियम, लोह आणि विविध अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात.
केळी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर असून फायबर, स्टार्च, जीवनसत्त्वे, खनिजे, फायटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्स हे टाइप २ मधुमेहाशी लढतात
केळीमध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.
केळ्यामुळे हाडे मजबूत होतात. यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात