Anuradha Vipat
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मंत्रोच्चाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रानुसार, या दिवशी योग्य मंत्रांचा जप केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते .
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी धन, ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्तीसाठी पुढील शक्तिशाली मंत्रांचा जप अवश्य करावा.
हा लक्ष्मी मातेचा सर्वात प्रभावशाली मंत्र मानला जातो. याद्वारे जीवनातील पैशांची चणचण दूर होते.
ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मायै नमः।
हा मंत्र छोटा असला तरी अत्यंत ऊर्जेने भरलेला आहे. रोजच्या पूजेतही याचा वापर करता येतो.
ॐ श्रीं ह्रीं क्लीं त्रिभुवन महालक्ष्मायै अस्माकं दारिद्र्य नाशय नाशय प्रचुर धन देहि देहि क्लीं ह्रीं श्रीं ॐ।
भगवान कुबेर हे धन आणि संपत्तीचे रक्षक मानले जातात. लक्ष्मी पूजेत त्यांचा मंत्र म्हणणे आवश्यक आहे.
ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये, धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा।
पूजा करताना लक्ष्मी मातेचे ध्यान करण्यासाठी हा सोपा मंत्र म्हणावा.
ॐ श्रीं नमः।किंवाॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः।
ऋग्वेदातील 'श्री सूक्त' हा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचा सर्वात जुना आणि सिद्ध मार्ग आहे. पूजेच्या वेळी याचे पठन किंवा श्रवण केल्याने घरात कधीही अन्नाची आणि धनाची कमतरता भासत नाही.