Nachani Bhakari : नाचणीची भाकरी खाण्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Mahesh Gaikwad

सुपरफूड

नाचणी हे एक तृणधान्य असून याला सुपरफूड असेही म्हणतात. यामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

Nachani Bhakari | Agrowon

हाडे व दातांची मजबूती

नाचणी हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. नियमित नाचणीची भाकरी खाल्ल्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

Nachani Bhakari | Agrowon

वजन कमी होते

नाचणीची भाकरी खाल्ल्याने पोट दिर्घकाळ भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे जास्त खाणे टाळले जाते आणि वजन नियंत्रणात राहते.

Nachani Bhakari | Agrowon

पचनसंस्था सुधारते

नाचणीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होते व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

Nachani Bhakari | Agrowon

ह्रदयविकार

नाचणीतील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Nachani Bhakari | Agrowon

रक्तातील साखर

नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. नाचणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Nachani Bhakari | Agrowon

स्मरणशक्ती

नाचणीमध्ये अमिनो अ‍ॅसिड व लोह हे घटक असतात, जे मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ करतात. यामुळे तुमची स्मरणशक्तीही तल्लख होण्यास मदत होते.

Nachani Bhakari | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

नाचणीतील अँटीऑक्सिडंट्स आणि पोषकतत्त्वे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास फायदेशीर ठरतात.

Nachani Bhakari | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....