Mahesh Gaikwad
पावसाळा सुरू झाला की, डासांचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाळ्यात डास चावल्यामुळे होणारे आजार सामान्य असतात.
पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे डासांमुळे आजार होतात. यापैकी डेंग्यू हा एक धोकादायक आजार आहे.
डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती प्रजातीचा डास चावल्यामुळे होतो. अशावेळी या डेंग्यूचा डास चावल्यास याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
आज आपण डेंग्यूच्या आजाराची प्राथमिक लक्षणे काय असतात. याची माहिती पाहणार आहोत.
डेंग्यूचा प्रादुर्भाव झालेल्या रूग्णांना पुरळ येणे, डोकेदुखी, तीव्र ताप, सांधेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, मळमळणे आणि उलट्या होतात.
डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते. डेंग्यूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास रक्तस्त्राव, अवयव निकामी होणे एवढेच नाही तर जीव जाण्याचाही धोका संभवतो.
काही उपाययोजना केल्यास डेंग्यूपासून बचाव करता येणे शक्य आहे. जुनी भांडी, नाल्या, खराब टायर, नारळाच्या करवंट्या यामध्ये पाणी साचू देवू नये.
कुलरमध्ये पाणी असल्यास त्यामध्ये रॉकेल टाकावे. यामुळे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता कमी होते.
तुमच्या घरामध्ये किंवा आसपास डांसांचा प्रादुर्भाव झाला असेल, तर अंगभर कपडे घाला. संध्याकाळच्या वेळी घराची दारे खिडक्या बंद करा. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.