Mahesh Gaikwad
हळद ही नैसर्गिक दाह रोधक आहे. यामध्ये असणाऱ्या करकुमीन घटकामुळे मेंदूची सूज कमी होते. तसेच अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी होतो.
मेंदूच्या आरोग्यासाठी मासे खाणे फायदेशीर असते. सॅल्मन आणि ट्यूना या माशांमध्ये ऑमेगा-३ फॅटी अॅसिड असते, ज्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना मिळते.
ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीसारख्या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते, जे मेंदूच्या पेशींना संरक्षित करते आणि स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात.
डार्क चॉकलेटमधील फ्लॅवोनॉइड्स आणि कॅफीन हे घटक मेंदूला उर्जावान ठेवतात. तसेच एकाग्रता वाढविण्यासही मदत होते.
बदामामध्ये असणाऱ्या पोषक तत्वांमुळे मेंदूच्या पेशींना संरक्षण मिळते आणि स्मरणशक्ती दीर्घकाळापर्यंत टिकून राहते.
आवळ्यामध्ये मुबलक व्हिटामिन-सी असते, जे मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करते आणि स्मरणशक्ती तीव्र करते.
पालक, मेथीसारख्या पालेभाज्यांध्ये भरपूर प्रमाणात फोलेट आणि व्हिटॅमिन-के यासारखे पोषक घटक असतात, जे मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
अक्रोडमधील ओमेगा-3 फॅटी ॲसिड्समुळे न्यूरॉन्स मजबूत होतात. तसेच मेंदूच्या कार्यक्षमतेस चालना मिळते. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.