Mahesh Gaikwad
स्नायू, त्वचा, केस आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी प्रोटीन आवश्यक घटक आहे. शरीराची प्रोटीनची कमी भरून काढण्यासाठी शाकाहारी पदार्थ कोणते याची माहिती पाहुयात.
हरभरा, मूग, उडीद, मसूर यासारख्या डाळींमध्ये उच्च प्रमाणात प्रोटीन असते. रोजच्या जेवणात कमीत कमी १ वाटी डाळींचा समावेश करा.
सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीनसह सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स असतात. टोफू हा प्रोटीनचा उत्तम शाकाहारी पर्याय आहे.
बदाम, अक्रोड, शेंगदाणे आणि फ्लॅक्ससीड, चिया सीड्स यामध्ये प्रोटीनसोबत चांगले फॅट्सही असतात.
दुग्धजन्य पदार्थांमध्ये उत्तम दर्जाचे प्रोटीन असते. लो-फॅट दही, दूध आणि पनीरचा रोजच्या आहारात समावेश केल्यास प्रोटीनची कमी भरून निघते.
ब्राउन राईस, ओट्स, क्विनोआ, रागी, ज्वारी, बाजरी हे धान्य प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. पॉलिश्ड तांदळाऐवजी या धान्यांचा आहारात समावेश करा.
पालेभाज्या जसे की, पालक, मेथी, शेपू आणि मशरूम यामध्ये प्रोटीनबरोबर फायबर्स आणि आयर्नही भरपूर असते. दररोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश आवश्य करा.
प्रोटीनयुक्त शाकाहारी आहार घेत असतानाच पचन सुधारण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि व्यायाम करा. गरजेनुसार आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.