Anuradha Vipat
काही वेळा बोलण्यापेक्षा शांत राहणे अधिक प्रभावी आणि शहाणपणाचे ठरते.
खालील प्रसंगांत तुमचे तोंड बंद ठेवणे किंवा शांत राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
अर्धवट ज्ञानावर बोलणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. अशा वेळी शांत राहून आधी माहिती करून घेणे केव्हाही उत्तम.
रागात आपण अनेकदा असे शब्द बोलतो जे नंतर मागे घेता येत नाहीत. रागाच्या वेळी शांत राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
जर तुमचे बोलणे कोणाचे मन दुखावत असेल किंवा कोणाचा अपमान करत असेल, तर तिथे गप्प राहणे हाच सुसंस्कृतपणा आहे.
जेव्हा कोणी तुमच्यावर विश्वास ठेवून एखादी गोष्ट सांगितली असेल, तेव्हा ती गुपित ठेवणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे.