Mango Diseases: भुरी रोगाचा इशारा! आंबा बागायतदारांनी तात्काळ घ्यावयाची काळजी

Swarali Pawar

शेतकऱ्यांसाठी इशारा

ढगाळ वातावरणात आंब्यावर रोग वेगाने वाढतात. भुरी रोग सध्या सर्वात मोठा धोका ठरत आहे.

Weather Impact | Agrowon

भुरी रोग म्हणजे काय?

हा रोग ओइडियम मॅंगिफेरी या बुरशीमुळे होतो. तो प्रामुख्याने मोहोर व कोवळ्या पानांवर दिसतो.

Powdery Mildew | Agrowon

रोग वाढण्याची परिस्थिती

ढगाळ हवामान व थंड रात्री रोग वाढवतात. १५ ते २५ अंश तापमानात धोका जास्त असतो.

Environment | Agrowon

भुरी रोगाची सुरुवात

संसर्ग फुलांच्या घडाच्या टोकापासून सुरू होतो. हळूहळू संपूर्ण घड व पाने व्यापतो.

Favourable Environment | Agrowon

रोगाची ओळख

फुलांवर व पानांवर पांढरी पावडरसारखी वाढ दिसते. कधी कधी ती राखाडी रंगाचीही दिसते.

Identify Disease | Agrowon

होणारे नुकसान

फुले गळतात आणि फळधारणा कमी होते. लागलेली फळेही अकाली गळून पडतात.

Crop Loss | Agrowon

रोग नियंत्रण उपाय

वेटेबल सल्फर किंवा हेक्साकोनाझोलची फवारणी करा. रोग दिसताच उशीर न करता औषध वापरा.

Control Measures | Agrowon

शेतकऱ्यांसाठी संदेश

वेळीच उपाय केल्यास मोठे नुकसान टाळता येते. मोहोर वाचवा आणि आंब्याचे उत्पादन वाढवा.

Advice for Farmer | Agrowon

Crop Cover: उन्हाळ्यात पिकांचे संरक्षण: क्रॉप कव्हरचा स्मार्ट वापर

Agrowon
अधिक माहितीसाठी...