Poultry Management : पावसाळ्यात असं करा पोल्ट्री व्यवस्थापन

Mahesh Gaikwad

पोल्ट्री व्यवस्थापन

काही दिवसांतच पावसाळी हंगामाला सुरूवात होईल, अशावेळी पोल्ट्री व्यावसायिकांनी वेळेनुसार पोल्ट्री व्यवस्थापनात बदल करणे गरजेचे आहे.

Poultry Management | Agrowon

कोंबड्यांना आजाराचा धोका

पावसाळ्यात वातावरणातील बदल आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे कोंबड्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते.

Poultry Management | Agrowon

स्वच्छ पिण्याचे पाणी

कोंबड्यांचे पिण्याचे पाणी गढूळ किंवा शेवाळयुक्त होते. अशा पाण्यात विविध जंतूंची वाढ होते. यामुळे कोंबड्यांना रोगांची लागण होण्याची शक्यता असते. परिणामी कोंबड्यांसाठी स्वच्छ आणि निर्जंतूक पिण्याच्या पाण्याची सोय करावी.

Poultry Management | Agrowon

माशांचा प्रादुर्भाव

पावसाळ्यात पोल्ट्रीशेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच वातावरणामुळे शेडमधील वाढलेल्या अमोनियाचा कोंबड्यांच्या डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे शेडची स्वच्छता ठेवावी.

Poultry Management | Agrowon

पोल्ट्रीशेडची बांधणी

पावसाची दिशा आणि वाऱ्याचा वेग याचा विचार करूनच पोल्ट्रीशेड पूर्व-पश्चिम बांधलेले असावे. याशिवाय शेडवरील पत्रा मजबूत असावा. जेणेकरून वादळी वाऱ्याने तो उडून जावू नये.

Poultry Management | Agrowon

पोल्ट्रीशेडची स्वच्छता

पोल्ट्रीशेडच्या सभोवतालचे वाढलेले गवत काढून टाकावे. तसेच शेडच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता ठेवावी.

Poultry Management | Agrowon

पोल्ट्री लिटर

पावसाळ्यात पोल्ट्रीशेडमधील लिटर किंवा गादी दिवसातून किमान एकवेळा तरी खालीवर हलवून घ्यावी. लिटरमध्ये आर्द्रता राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

Poultry Management | Agrowon

खाद्य साठवणूक

एक आठवडा पूरेल एवढ्याच खाद्याची साठवणूक करावी, जास्त दिवस खाद्य साठविल्यास त्यामध्ये बुरशी होण्याची शक्यता असते.

Poultry Management | Agrowon