Anuradha Vipat
बाळंतपणानंतर वजन नियंत्रणात आणणे आणि फिटनेस मिळवणे यासाठी नैसर्गिक व घरगुती पद्धतींचा वापर करणे अत्यंत सुरक्षित मानले जाते.
बाळंतपणानंतर शरीराला पुन्हा पूर्ववत होण्यासाठी किमान ६ ते ८ आठवडे लागतात.
बाळंतपणानंतर अंगावर पाजल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज वेगाने जळतात आणि गर्भाशय पुन्हा मूळ आकारात येण्यास मदत होते.
ओवा पचनक्रिया सुधारतो, पोट साफ ठेवतो आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतो.
जिरे आणि बडीशोप एकत्र उकळून ते पाणी गाळून दिवसभर पिण्यासाठी वापरावे. यामुळे शरीरातील सूज कमी होते
मेथी शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी करण्यास मदत करते, तर डिंक पाठीच्या आणि कंबरेच्या हाडांना बळकटी देतो.
नॉर्मल डिलिव्हरी झाली असल्यास ४ ते ६ आठवड्यांनंतर आणि सिझेरियन झाले असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ८ ते १० आठवड्यांनंतर हळूहळू चालायला सुरुवात करावी.