Anuradha Vipat
बाळ झाल्यानंतर आईची चिडचिड होणे ही एक अतिशय सामान्य प्रक्रिया आहे.
बाळ झाल्यानंतर आईची चिडचिड होणेयामागे शारीरिक, मानसिक आणि परिस्थितीजन्य अशी अनेक कारणे असतात.
बाळंतपणानंतर शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी अचानक कमी होते. या बदलांमुळे चिडचिड होते
नवजात बाळाला दर दोन-तीन तासांनी दूध पाजावे लागते. सततची अपुरी झोप आईच्या मेंदूवर ताण निर्माण करते
प्रसूतीनंतर शारीरिक अशक्तपणा आणि कंबरदुखी किंवा टाके दुखणे यामुळे आईला अस्वस्थ वाटते ज्याचे रूपांतर चिडीत होते
बाळ झाल्यानंतर सुरुवातीच्या १०-१५ दिवसांत अनेक स्त्रियांना 'बेबी ब्लूज'चा त्रास होतो. यात रडू येणे, भीती वाटणे आणि अस्वस्थता जाणवते.
बाळाची काळजी नीट घेता येईल का? बाळ का रडतंय? अशा शंकांमुळे आईच्या मनावर दडपण येते.