Anuradha Vipat
जर पती-पत्नीमध्ये विनाकारण वाद होत असतील तर गुरुवारी काही सोपे आध्यात्मिक उपाय केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येऊ शकतो.
गुरुवार हा गुरु ग्रहाचा आणि भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो
गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर विष्णू-लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा. देवाला चिमूटभर हळद अर्पण करा आणि त्याच हळदीचा टिळा पती-पत्नीने आपल्या कपाळावर लावावा.
गुरुवारी पिवळ्या रंगाचे महत्त्व जास्त असते. या दिवशी गरजू व्यक्तीला पिवळे कपडे, हरभरा डाळ किंवा केळी दान करा.
पती-पत्नीने मिळून गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी. झाडाला जल अर्पण करून ७ वेळा प्रदक्षिणा घालावी.
गुरुवारी शक्य असल्यास घरात मीठ टाकलेल्या पाण्याने फरशी पुसावी. यामुळे घरातील कटकटी कमी होतात.
गुरुवारी संध्याकाळी घरात 'विष्णू सहस्रनाम' किंवा 'गुरु चरित्रातील' काही अध्यायांचे वाचन करा.