Anuradha Vipat
प्रसूतीनंतर आईच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो आणि स्तनपानामुळे कॅल्शियम व लोहाचा साठा कमी होतो.
यामुळे थकवा येणे, कंबरदुखी, हाडे कमकुवत होणे आणि ॲनिमिया (रक्तपांढरी) सारख्या समस्या उद्भवू शकतात.
आहारात पालक, मेथी आणि माठाची भाजी समाविष्ट करा. पालकाची डाळ किंवा सूप प्रसूतीनंतर अतिशय फायदेशीर ठरते.
पांढऱ्या साखरेऐवजी गुळाचा वापर करा. काळे तीळ आणि गूळ यांचे लाडू लोह आणि कॅल्शियम दोन्हीचा उत्तम स्रोत आहेत.
रोज किमान १-२ ग्लास कोमट दूध प्या. तसेच आहारात ताक, दही आणि पनीरचा समावेश करा.
नाचणी हा कॅल्शियमचा सर्वात मोठा शाकाहारी स्रोत आहे. नाचणीची भाकरी, लाडू किंवा सत्व (अंबील) खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
लोहाचे शोषण वाढवण्यासाठी जेवणासोबत किंवा लोहयुक्त पदार्थांसोबत व्हिटॅमिन C युक्त गोष्टी खा. डाळीवर किंवा भाजीवर लिंबू पिळून खाणे हा उत्तम उपाय आहे