Anuradha Vipat
डिलीव्हरीनंतर पोट लगेच कमी न होण्यामागे अनेक शारीरिक आणि वैज्ञानिक कारणे असतात.
नऊ महिने गर्भाशय बाळासोबत विस्तारलेले असते. गर्भाशयाला आपल्या मूळ जागी आणि आकारात येण्यासाठी साधारण ६ ते ८ आठवडे लागतात
गरोदरपणात पोटाचे स्नायू खूप जास्त ताणले जातात. यामुळे पोट बाहेर आल्यासारखे दिसते आणि ते पूर्ववत होण्यास वेळ लागतो
गरोदरपणात शरीरात नैसर्गिकरित्या अतिरिक्त चरबी साठवली जाते. ही चरबी पोट, मांड्या आणि कमरेच्या भागात साठते.
शरीरातील हार्मोन्सच्या बदलांमुळे पचनक्रिया मंदावणे किंवा शरीरात पाणी साठून राहणे यामुळेही पोट सुजलेले वाटते.
डिलिव्हरीनंतर बाळाच्या संगोपनामुळे आईची झोप पूर्ण होत नाही, ज्यामुळे शरीरातील 'कोर्टिसोल' हार्मोन वाढून पोटाचा घेर वाढतो.
स्तनपानामुळे शरीरातील कॅलरीज जळतात आणि गर्भाशय लवकर आकुंचन पावण्यास मदत होते.