Anuradha Vipat
ज्वेलरी घेताना 'मेकिंग चार्जेस' आकारण्यामागे काही महत्त्वाची कारणे असतात.
सोन्याला हवा तसा आकार देण्यासाठी कुशल कारागीर मेहनत घेतात.
जर दागिना हाताने बनवलेला असेल किंवा त्यावर क्लिष्ट नक्षीकाम असेल, तर मेकिंग चार्जेस जास्त असतात.
साधी सोन्याची साखळी बनवण्यापेक्षा जडाव काम, कुंदन किंवा हिऱ्यांचे दागिने बनवण्यासाठी जास्त कष्ट लागतात
दागिना घडवताना सोन्याचे काही कण वाया जातात किंवा कापले जातात. काही ज्वेलर्स हा 'वेस्टेज' खर्चही मेकिंग चार्जेसमध्येच समाविष्ट करतात.
ज्वेलरी डिझाईन करण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर, मशिन्स आणि शोरूमचा देखभालीचा खर्चही काही प्रमाणात यातून भागवला जातो.
मेकिंग चार्जेस हे सोन्याच्या वजनावर किंवा प्रति ग्रॅम दराच्या ठराविक टक्के आकारले जातात.