Anuradha Vipat
बाळंतपणानंतर महिलांचे पोट सुटणे किंवा बेली फॅट वाढणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
गर्भधारणेदरम्यान वाढत्या बाळाला सामावून घेण्यासाठी गर्भाशय फुगते.
डिलिव्हरीनंतर गर्भाशयाला मूळ आकारात येण्यासाठी किमान ६ ते ८ आठवडे लागतात, तोपर्यंत पोट मोठे दिसते.
शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत होणाऱ्या बदलांमुळे पोटाच्या भागात चरबी साठते.
गरोदरपणात पोटाचे स्नायू ताणले जातात . डिलिव्हरीनंतर हे स्नायू लगेच पूर्ववत होत नाहीत.
गर्भधारणेदरम्यान शरीरात रक्ताचे आणि पाण्याचे प्रमाण वाढलेले असते, ते बाहेर पडायला वेळ लागतो.
बाळंतपणानंतर शारीरिक हालचाल कमी होते. तसेच, दूध येण्यासाठी दिला जाणारा अधिक कॅलरीचा आहार यामुळे चरबी वाढवू शकतो.