Anuradha Vipat
व्यायामानंतर स्ट्रेचिंग करणे हे केवळ विश्रांती नसून शरीराच्या रिकव्हरीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे असते.
व्यायामादरम्यान स्नायू आकुंचन पावतात. स्ट्रेचिंगमुळे ते पुन्हा त्यांच्या मूळ आकारात येतात.
स्ट्रेचिंगमुळे स्नायूंकडे होणारा रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.
स्ट्रेचिंग केल्यास शरीराची लवचिकता वाढते, ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या दुखापती किंवा 'मसल्स क्रॅम्प्स'चा धोका कमी होतो.
कठीण व्यायामामुळे स्नायूंमध्ये लॅक्टिक ॲसिड जमा होते, ज्यामुळे अंगदुखी जाणवते.
व्यायामानंतरचे १० मिनिटांचे स्ट्रेचिंग हृदयाचे ठोके सामान्य करते आणि मनाला शांतता देते.
व्यायामानंतर ५-१० मिनिटे हलके स्ट्रेचिंग करणे दीर्घकालीन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते