Anuradha Vipat
जेवणानंतर आपण नकळत काही अशा चुका करतो ज्याचा आपल्या पचनसंस्थेवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिल्याने अन्न नीट पचत नाही आणि गॅस किंवा ॲसिडिटीची समस्या निर्माण होते.
जेवल्याबरोबर लगेच बेडवर पडल्याने अन्नाचे पचन होण्याऐवजी ते पोटाच्या वरच्या भागात येते, ज्यामुळे छातीत जळजळ आणि पोटाचे विकार होतात.
जेवणानंतर चहा पिल्याने अन्नातील लोह शोषून घेण्यास अडथळा निर्माण करते यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते
जेवणानंतर केलेले एक धूम्रपान हे दिवसातील १० सिगारेट ओढण्याइतके घातक असते.
जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने ती पोटात नीट पचत नाहीत आणि पोटातील अन्नासोबत कुजू लागतात.
जेवणानंतर जड व्यायाम केल्याने पचनक्रिया विस्कळीत होते.