Anuradha Vipat
घरातील वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक ठेवण्यासाठी वास्तूशास्त्र आणि मानसशास्त्रानुसार काही सोपे बदल करणे फायदेशीर ठरते.
सकाळी उठल्यावर घरात थोडा वेळ संथ आवाजात स्तोत्रे, मंत्र किंवा सुश्राव्य संगीत लावा.
घर नेहमी आवरलेले आणि स्वच्छ ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
सकाळी खिडक्या आणि दारे उघडी ठेवा, जेणेकरून सूर्यप्रकाश आणि ताजी हवा घरात येईल.
लिव्हिंग रूम किंवा बाल्कनीत तुळस, कोरफड, मनी प्लांट किंवा स्नेक प्लांट यांसारखी झाडे लावा.
आठवड्यातून एकदा तरी लादी पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाका.
संध्याकाळी घरात भीमसेनी कापूर जाळावा, यामुळे वातावरण शुद्ध आणि प्रसन्न होते.