Mahesh Gaikwad
जर तुम्हाला एखादी गोष्ट नीट आणि स्वच्छ दिसत नसेल किंवा दूरवर पाहताना तुम्ही सतत डोळे मिचकवत असाल, तर ही नजर कमजोर होण्याची लक्षणे असू शकतात.
वाचन करताना अक्षरे धुरस दिसणे किंवा एखाद्या दुरवरील माहिती फलकावरील माहिती अस्पष्ट दिसणे, हे दृष्टीदोषाचे लक्षण असू शकते.
डोळे चुरचुरणे, थकल्यासारखे वाटणे किंवा डोळ्यांमध्ये जळजळ होणे, हे देखील कमजोर दृष्टीचे लक्षण असू शकते.
एखादे पुस्तक वाचताना बारीक नजर करून वाचणे किंवा वाचत असलेली ओळ हरवणे ही नजर कमजोर होण्याची लक्षणे आहेत.
काही लोकांना जवळच्या वस्तू पाहण्यात अडचण येते, तर काहींना दूरच्या वस्तू पाहण्यात त्रास होतो.
डोळ्यांना थकवा येणे यासह कोरडेपणा, खवखव जाणवणे हेही नजर कमकुवत होण्याचे लक्षणे असू शकतात.
रात्री ड्रायव्हिंग करताना समोरील लाईटमुळे अस्वस्थता वाटणे किंवा स्पष्ट न दिसणे ही देखील नजर कमजोर होण्याचे गंभीर लक्षणे आहे.
नजर कमजोर झाल्यास डोळ्यांवर ताण येतो आणि त्याचा परिणाम डोकेदुखीच्या स्वरूपात दिसतो. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.