sandeep Shirguppe
फळांबरोबर सालीमध्येही अनेक आरोग्यदायी गुणकारी घटक असतात, यातील डाळींब्याच्या सालीमध्येही अनेक उपयुक्त घटक आहेत.
डाळिंबाची साल सुकवून त्याची पावडर करुन घ्या. डाळिंबाच्या सालीची पावडर घसादुखी, खोकला, कमी होण्यास मदत होते.
पोटाच्या समस्या आणि हाडांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.
डाळिंबाच्या सालीची चहा बनवून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता.
अतिसार आणि इतर पचन समस्यांवर देखील डाळिंबाची साल एक उत्तम घरगुती उपाय आहे.
महागड्या व्हिटॅमिन सप्लिमेंट्सऐवजी तुम्ही आहारात डाळींबाच्या सालीचा वापर करु शकता.
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स जास्त असल्याने ते बॅक्टेरिया आणि इतर संसर्गापासून बचाव करण्यास मदत करतात.
ही फक्त सामान्य माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहे याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.