Anuradha Vipat
डाळिंब हे केवळ चवीलाच चांगले नाही, तर ते आरोग्यासाठी एक 'सुपरफूड' मानले जाते.
डाळिंबात लोहाचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे रक्ताल्पता किंवा अॅनेमिया दूर होतो.
डाळिंबात असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि नैसर्गिक चमक येते.
हे रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो.
व्हिटॅमिन 'सी' आणि 'ई' मुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची शक्ती वाढते.
डाळिंबातील फायबर पचनसंस्था स्वच्छ ठेवते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करते.
मेंदूच्या पेशींचे रक्षण करून स्मरणशक्ती सुधारण्यास डाळिंब मदत करते.