Mahesh Gaikwad
जगाच्या तुलनेत भारत डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहे. मात्र, यंदाच्या हंगामात भारतातून डाळिंबाची निर्यात मंदावली आहे.
यंदाच्या हंगामात नोव्हेंबरअखेर सुमारे ३८ हजार टन डाळिंब आणि दाण्यांची निर्यात झाली आहे.
डाळिंबाची ही निर्यात यंदा कमीच राहण्याचा अंदाज डाळिंब उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
देशात गेल्या दोन वर्षांत डाळिंबावर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला. याचा फटका डाळिंबासह त्याच्या दाण्यांच्या निर्यातीवर झाल्याने निर्यात रोडावली आहे.
उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या भारतात जवळपास दोन लाख १५ हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातसह दहा राज्यांत डाळिंबाचे उत्पादन होते. यापैकी सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रात आहे.
भारतातून वर्षभर युरोपासह आखाती, ओमान, बहरीन, श्रीलंका, बांगलादेश, कतार, नेदरलँडसह सुमारे ३० हून अधिक देशात डाळिंबाची निर्यात होते.