Anuradha Vipat
सततचा आणि तीव्र खोकला हे न्यूमोनियाचे एक प्रमुख लक्षण असू शकते.
न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा एक गंभीर संसर्ग आहे, ज्यामध्ये फुफ्फुसातील हवेच्या छोट्या पिशव्या जंतू, द्रव किंवा पू यांनी भरतात.
न्यूमोनियाचे निदान करण्यासाठी डॉक्टर छातीचा एक्स-रे किंवा रक्त तपासणी करतात.
वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास न्यूमोनिया बरा होऊ शकतो.
खोकल्याबरोबर पिवळा, हिरवा, किंवा कधीकधी रक्ताच्या छटा असलेला कफ पडतो
न्यूमोनियात खूप जास्त ताप येणे. तीव्र थंडी वाजणे . धाप लागणे किंवा श्वास घेताना वेदना होऊ शकतात
न्यूमोनियात विशेषतः खोकताना किंवा दीर्घ श्वास घेताना छातीत दुखतं. खूप जास्त अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो.