Malabar Neem Farming : 'हे' झाड शेताच्या बांधावर लावा, होईल बक्कळ कमाई

Aslam Abdul Shanedivan

भारत हा कृषिप्रधान देश

भारत हा कृषिप्रधान देश असून पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी ऊस, गहू, मका, कडधान्ये आणि तेलबिया पिके पेरून आपला उदरनिर्वाह करतात.

Malabar Neem Farming | Agrowon

पारंपारिक शेती

या बदलत्या युगात अर्थार्जनासाठी पारंपारिक शेतीसह शेतकऱ्यांनी इतर पिके किंवा फळबागांवरही भर दिला पाहिजे. याद्वारे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा नफा सहज मिळू शकतो.

Malabar Neem Farming | Agrowon

मलबार कडुलिंबाची झाडे

मलबार कडुलिंबाची झाडे पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात.

Malabar Neem Farming | Agrowon

मलबार कडुनिंबाचा वापर

मलबार कडुनिंबाचे लाकूड पॅकिंग, माचिसच्या काड्या तयार करणे, खुर्च्या, टेबल, सोफा बनवणे आणि इतर कामांसाठी देखील वापरले जाते.

Malabar Neem Farming | Agrowon

किड लागत नाही

मलबार कडुलिंबाचे लाकूड बाजारात महागड्या दराने विकले जाते. कारण त्याला वाळवी (किड) लागत नाही.

Malabar Neem Farming | Agrowon

फर्निचरला मोठी मागणी

त्यामुळेच यापासून बनवलेल्या फर्निचरला देशात आणि जगात मोठी मागणी आहे.

Malabar Neem Farming | Agrowon

छोटी सुरुवात

एकाच वेळी जास्त झाडांची लागवड न करता फक्त शेताच्या बांधावर मलबार कडुनिंबाची रोपे लावून छोटी सुरुवात करू शकतात, ज्यामुळे काही वर्षांत मोठा नफा मिळू शकतो.

Malabar Neem Farming | Agrowon

Farmer Success Story : गरम भागातही फुलवली अवलियाने सफरचंदाची बाग

आणखी पाहा