Anuradha Vipat
नाताळच्या निमित्ताने घरच्या घरी मऊ आणि चविष्ट एगलेस प्लम केक बनवण्यासाठी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.
ड्राय फ्रूट्स, संत्र्याचा रस, मैदा, पिठीसाखर किंवा गूळ पावडर, दालचिनी आणि लवंग पावडर, तेल किंवा लोणी , दूध , बेकिंग पावडर, बेकिंग सोडा.
सर्व ड्राय फ्रूट्स आणि टूटी-फ्रूटी संत्र्याच्या रसात किमान २-३ तास भिजत ठेवा. पॅनमध्ये साखर वितळवून त्यात थोडे पाणी घालून 'कॅरॅमल सिरप' तयार करा.
तेल, साखर आणि कॅरॅमल सिरप एकत्र करा. त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मसाल्यांची पावडर चाळून घाला . या मिश्रणात ज्यूससह भिजवलेले सर्व ड्राय फ्रूट्स टाका .
केकच्या भांड्याला तूप लावून ग्रीस करा. हे मिश्रण त्यात ओता आणि वरून थोडे सुके मेवे सजवा. प्रि-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १८०°C वर ३५-४० मिनिटे बेक करा.
केक पूर्णपणे थंड झाल्यावरच बाहेर काढा आणि त्याचे काप करा. प्लम्स केकची चव दुसऱ्या दिवशी अधिक छान लागते.
जर तुम्हाला अल्कोहोल वापरायचे असेल तर ज्यूसऐवजी 'रम' किंवा 'ब्रँडी'मध्ये ड्राय फ्रूट्स भिजवू शकता . अशा प्रकारे तुमचा ख्रिसमस स्पेशल प्लम केक तयार होईल