Soil Ploughing : अशी करा कोरडवाहू जमिनीची नांगरट

Team Agrowon

कोरडवाहू भागातील जमिनी या काळ्या आणि भारी असतात. अशा जमिनीत चिकणमातीचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त असते. जमिनीची खोली ६० ते ९० सेंमीपर्यंत असते.

Soil Ploughing | Agrowon

या जमिनीतील ओलीचे प्रमाण कमी होताच, भेगा पडण्यास सुरुवात होते. आणि जमीन कठीण बनते. अशा जमिनीची नांगरट प्रत्येक वर्षी केल्याने जमिनीच्या कण रचनेवर विपरीत परिणाम होतो.

Soil Ploughing | Agrowon

जमीन प्रमाणापेक्षा जास्त पोकळ राहते. ज्वारी, बाजरी यांसारख्या लहान आकाराचे बियाणे असलेल्या पिकांची उगवणशक्ती कमी होते.

Soil Ploughing | Agrowon

बियाणे, माती आणि पाणी यांचा संपर्क तसेच जमिनीतील ओलावा आणि तापमानाचा एकत्रित परिणाम बियाणाच्या उगवणशक्तीवर होतो. म्हणून भारी, काळ्या जमिनीची तीन वर्षांतून एकदाच नांगरट करावी.

Soil Ploughing | Agrowon

कोरडवाहू शेतीमध्ये ४५ सेंमी खोलीपर्यंतच्या जमिनीत तूर अथवा सूर्यफुलासारखी पिके घेतल्यानंतर पुढील हंगामापर्यंत जमिनी मोकळ्याच असतात.

Soil Ploughing | Agrowon

अशा जमिनीची नांगरट ही पिके निघताच जमिनीत ओल असेपर्यंत हिवाळी हंगामात पूर्ण करावी. म्हणजे काम जलद गतीने आणि कमी कष्टात होते.

Soil Ploughing | Agrowon

नांगरट उताराला आडवी करावी. जेणेकरून पावसाळी हंगामाच्या सुरुवातीला पडणारे पावसाचे पाणी या नांगरटीत पूर्ण मुरेल.

Soil Ploughing | Agrowon

Tax Free Countries : जगातील 'टॅक्स फ्री' देशांबद्दल माहितेय का?