Swarali Pawar
यंदा पाऊस कमी राहण्याची शक्यता असल्याने चारा नियोजन महत्त्वाचे आहे. योग्य चारा पिकांची निवड केल्यास टंचाईच्या काळातही जनावरांना चारा मिळू शकतो.
बाजरी हलक्या ते मध्यम जमिनीत चांगली वाढते आणि कमी पाणी लागते. जायंट बाजरा वाणातून हेक्टरी 450 ते 500 क्विंटल हिरवा चारा मिळू शकतो.Agrowon
ज्वारी हे कमी पावसाच्या भागासाठी सर्वात उपयुक्त चारा पीक मानले जाते. फुले गोधन, रुचिरा आणि फुले अमृता या जाती चांगले उत्पादन देतात.
मक्याला थोडे अधिक पाणी लागते, पण त्याचा चारा पौष्टिक असतो. आफ्रिकन टॉल आणि गंगा सफेद-2 सारख्या जाती लोकप्रिय आहेत.
संकरित नेपिअर हे बहुवार्षिक पीक असून एकदा लागवड केल्यावर अनेक कापण्या मिळतात. फुले जयवंत आणि फुले गुणवंत या जातींची शिफारस केली जाते.
चवळी हे प्रथिनयुक्त द्विदल चारा पीक आहे. श्वेता आणि बुंदेल लोबिया या जाती चाऱ्यासाठी उपयुक्त ठरतात.
ज्वारी, बाजरीसोबत चवळी किंवा मूग घेतल्यास संतुलित चारा मिळतो. यामुळे जनावरांना ऊर्जा आणि प्रथिने दोन्ही मिळतात.
योग्य वाण, बीजप्रक्रिया आणि खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढते. आतापासून नियोजन केल्यास दुष्काळातही हिरव्या चाऱ्याची चिंता राहणार नाही.